• शिशुची पोटदुखी

    शिशुची पोटदुखी

  • 1

शिशुची पोटदुखी एक सर्वसाधारण समस्या आहे, खूप रडणे व बैचैनी ही त्याची लक्षणे असतात, जी विशेषत: संध्याकाळी व रात्री दिसतात. छोटी मुले नेहमी आपल्या पोटाकड़े पाय खेचताना दिसतात, जसे काही त्यांचे पोट खूप दुखत असते.

अभ्यासामुळे हे समजते की काही मुलांच्या पोट दुखीचे एक महत्वाचे कारण म्हणजे तातपुरत्या लैक्टेजचा अभाव होय. असे मानले जाते की जन्मत: मुलांच्या अपरिपक्व पचन संस्थे मुळे हे होते, ज्यामुळे ते दुधातील लैक्टोज पचवण्यासाठी पुरेसे लैक्टेज एंजाइमचे उत्पादन करू शकत नाहीत. जर तुमच्या बाळात दुधातील लैक्टोज पचवण्याची क्षमता नसेल तर त्याला आईचे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर किंवा दही खालल्या नंतर 30 मिनिटा पासून 2 तासांमध्ये जुलाब, पोट कडक होणे, पोट फुगणे किंवा गैसेस होऊ शकतात.

मुलाची पोटदुखी आणि लैक्टोज न पचण्याच्या समस्येच्या नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांसाठी भारतात प्रथमच यामू ड्रॉप्स (लैक्टेज एंजाइम ड्रॉप्स) आणले आहेत, त्यामुळे लैक्टोजचे तुकडे होण्यास मदत होते व आशा प्रकारे लैक्टोज न पचण्याच्या समस्येचे निराकरण करण्यास मदत होते.

जर आपल्या शिशु मध्ये लैक्टोज न पचण्याची लक्षणे दिसू लागली तर ताबडतोब डॉक्टरांकड़े जा. डायरिया तसा भयंकर आजार आहे कारण ह्या आजारात बाळाच्या शरीरतील पाणी कमी होऊ शकते, जी एक गंभीर समस्या आहे व त्याकडे ताबडतोब लक्ष देने आवश्यक आहे.

जसे जसे मूल मोठे होत जाते त्याच्या शरीरामध्ये नैसर्गिक रूपाने तयार होणा-या लैक्टेज एंजाइमच्या स्तरात वाढ होत जाते आणि जेव्हा मुलाचे वय 3-4 महीने होते तेव्हा त्याच्या शरीरामध्ये लैक्टोज न पचवण्याची लक्षणे (आणि त्याची पोटदुखी ) नाहीशी होतात.

काही आई-वडील भावनवश त्रस्त होऊ शकतात व त्याना खूप रडणा-या मुलाला संभाळण्या मुळे त्रास होऊ शकतो

पोटदुखीची लक्षणे

पोटदुखीची मुख्य लक्षणे आहेत:

  • कुठल्याही विशिष्ट कारणाशिवाय व मुलाला गप्प करण्याचे अनेक प्रयत्न केल्यावर ही तो बराच वेळ रडत राहतो, अनेक वेळा मूल जोरजोरात रडत राहते. ही लक्षणे दररोज बहुतेक दुपारी किंवा संध्याकाळच्या वेली आणि जेवणा नंतर पाहवायस मिळतात.
  • मुलाच्या पोटात गैसेस झाल्याची लक्षणे दिसू लागतात किंवा पोट फुगलेले दिसते. रडताना मुलाच्या पोट दुखीची लक्षणे दिसू शकतात, जसे आपले गुढगे छाती कडे ओढणे, मुठी आवळणे, हात पाय किंवा पाठ आपटणे.
  • मुलाला बहुतेक झोप येत नाही, तो चीडचीड करू लागतो किंवा त्याला घाबरल्या सारखे वाटते.
  • बालचिकित्सक पोटदुखीचे निदान करण्यासाठी बहुतेक “तीन चे नियम” चा उपयोग करतात: “एक मूल, जे रोज तीन किंवा अधिक तास रडते, जे आठवड्यात कमीत कमी तीन वेळा रडते आणि पहिल्या तीन महिन्यां पर्यंत रडत राहते.” जगामध्ये जवळजवळ 25% मुले पोटदुखीच्या चिकित्सीय निदानासाठी “तीन चे नियम” च्या निष्कर्षानुसार बरोबर असतात.

पोटदुखीची समस्या असणा-या मुलांना लैक्टेज एन्जाइम ड्रॉप कसे मदत करते?

भारतामध्ये खूप प्रतिष्ठित ब्रण्ड आहेत जे नैसर्गिक रित्या सुरक्षित लैक्टेज एंजाइम रिप्लेसमेंट थेरेपी देतात. यामू त्यामधील एक आहे.

यामू ड्रॉप्स मुलांची पोटदुखी नाहीशी करण्यासाठी एक सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धत आहे. हे काही औषध नाही आहे परंतु एक नैसर्गिक एंजाइम आहे, जे जेवणातील लैक्टोजच्या स्तराला कमी करण्यासाठी मुलाला जेवणा अगोदर दिले जाऊ शकते.

यामू ड्रॉप्स दिल्यामुळे मुलाच्या पाचन संस्थेमध्ये संभावित तात्पुरती कमी पूर्ण होउन जाते. यामू ड्रॉप्स जेवणातील लैक्टोजच्या स्तराला कमी करतात, ज्यामुळे लैक्टोज ला सामान्य प्रकारे पचण्यासाठी मदत मिळते आणि लैक्टोज न पचण्याची लक्षणे पण दिसत नाहीत. जरी हे महत्वाचे आहे की पूर्ण लैक्टोज बाहेर नाही गेले पाहिजे कारण मुलाचे शरीर आपल्या आपण लैक्टोज निर्माण करणे चालू ठेवेल व काही वेळा नंतर त्याचे उत्पादन वाढत जाईल.

अभ्यासाने हे समजले आहे की मुलाच्या सामान्य दुधात लैक्टेज सप्लीमेंट मिळवाल्याने पोट दुखीने त्रस्त असलेल्या मुलांचे रडण्याचे तास जवळजवळ 45% कमी होऊ शकतात.

एक अन्य महत्वपूर्ण घटक हा आहे की यामू ड्रॉप्सचा उपयोग करून माता स्तनपान चालू ठेवू शकतात व जरी त्यांचे मूल लैक्टोज पचवण्यासाठी सक्षम नसले तरी सुद्धा हे मूल आणि आई दोघांसाठी लाभदायक ठरते.

जर मूल खूप रडत असेल पण ते स्वस्थ असेल तर हे होऊ शकते की ते मूल लैक्टोज न पचण्यामुळे रडत असेल कारण 1 ते 6 महिन्यांची मुले पुरेसे लैक्टेज एंजाइम उत्पन्न करू शकत नाहीत. अशा केसेस मध्ये आई-वडील लैक्टेज चिकित्सेच्या (यामू ड्रॉप्स) एक आठवड्यात ट्रायल घेऊ शकतात. ही शिफारिश अंतर्राष्ट्रीय दिशानिर्देशों-एनआईसीई -2014 (दी नेशनल इंस्टिट्यूट फॉर हेल्थ एंड केयर एक्सीलेंस) नी पण केली आहे. जर लैक्टेज चिकित्सेमुळे लक्षणांमध्ये सुधारणा झाली तर बाल्यावस्थे मध्ये 4 ते 6 महीने पर्यंत हे दिले जाऊ शकते, त्यानंतर ते पुरेश्या प्रमाणात लैक्टेज उत्पादन सुरू करतात.

मुलाला यामू ड्रॉप्स कसे द्यायचे?

यामू ड्रॉप्स 15 मिलीलीटरच्या बाटलीत येतात. प्रत्येक 1 मिलीलीटर मध्ये 600 एफ सी सी लैक्टेज एंजाइम असते.

मुलांसाठी ड्रॉप्सचे प्रमाण
निर्देश: (स्तनपानासाठी): यामू ड्रॉप्सचे 4 ते 5 थेंब स्तानातून काढलेल्या दुधात मिसळा. सुरवातीच्या दुधात लैक्टोज जास्त असते. थोड़ा वेळ वाट पहा नंतर हे मिश्रण मुलाला पाजा व मग नेहमीप्रमाणे स्तनपान करा.

नोट: सुरवातीच्या दुधात लैक्टोज जास्त असते. म्हणून आम्ही केवल काही मिनिटांची प्रतीक्षा करून मग हे मिश्रण मुलाला देण्याची व मग नेहमीप्रमाणे स्तनपान करण्यास सांगतो.

निर्देश: (फार्मूला / जनावरांच्या दुधासाठी): मुलाला पिण्यास देण्यात येणा-या गरम (300C ते 400C) दुधामध्ये यामू ड्रॉप्सचे 4 ते 5 थेंब टाका. व्यवस्थित हलवून मग ते दूध मुलाला पाजा.

नोट: 30 मिनिटे थांबण्यास सांगण्यात येते कारण फार्मूला जेवणाच्या पूर्ण मिश्रणामध्ये लैक्टोज चांगल्या प्रकारे मिसळले जाईल. लैक्टेज ड्रॉप घालून 30 मिनिटे वाट बघण्यामुळे 80% लैक्टोज परावर्तित होण्यास मदत मिळते.